जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादप्रमाणे यावर्षीही १९ वर्षाखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा, ‘फ’, गटासाठी अहमदनगर येथे दि. १० ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजीत केली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने उल्लेखनीय कामगीरी केली. ‘फ’ गटामध्ये पाच सामन्यात २१ गुणांची कमाई करून गट विजेता ठरला.
जळगाव जिल्हा संघातर्फे फलंदाजीत अमीत परदेशीने आठ डावात सर्वधिक २८० धावा, निरज जोशी २६०, आशुतोष मालूजकर २२६, दर्शन शर्मा आणि प्रज्वल राजपूत यांनी शतकी खेळी करून २१५ व १५८ धावा केल्या. गोलंदाजीत निरज जोशी याने १० डावात ३३ आणि आशुतोष मलुंजकर १८ व महेश तळेले १५ गडी बाद केले. या खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीच्या आधारे जळगाव जिल्हा संघाने अव्वल फेरीतील स्पर्धेसाठी आपले स्थान नक्की केले आहे. ही कामगिरी मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल व तन्वीर अहमद यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली. या गटात विजेता संघासह प्रशिक्षकांचे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व संपूर्ण कार्यकारणी ने कौतुक केले.