जामनेर तालुक्यातील सोनाळे गावातील रस्त्याची दुरावस्था प्रशासनाचे होते दुर्लक्ष-स्थानिक ग्रामस्थांची तक्रार
*
जामनेर उपसंपादक-शांताराम झाल्टे
जामनेर तालुक्यातील सोनाळे गावातील रस्त्याची दुरावस्था अत्यंत खराब असल्याने
प्रशासनाचे होते दुर्लक्ष अशी सोनाळे गावातील स्थानिक ग्रामस्थांची तक्रार केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे की
शासन आणि रस्ता हे दोन्ही चालण्यासाठी बनवले आहेत सरकार.
पण अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही सुद्धा होत नाही.
गावातील खराब रस्त्यांवर जर प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. पण असे कधी होत नाही जामनेर तालुक्यातील सोनाळे कडे जाणाऱ्या रस्त्यावरती अनेक जागोजागी खड़े पडले असुन
प्रवाशांना त्रास सहन करावे लागत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जाते परंतु, ग्रामीण भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हमेशा केले जात असते.
या गावातील रस्त्यांचे ना सिमेंटीकरण किंवा ना डांबरीकरण होतात म्हणून खड्डे जास्त प्रमाणात पडून वर्षांनंतरही दुरुस्ती केली जात नाही.
तसेच चारचाकी, ट्रॅक्टर व ट्रक यांची नेहमी रस्त्यावर वर्दळ असते. रस्ता पूर्ण उखडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती फारच दयनीय झालेली आहे.यामुळे रस्त्याची स्थिती सुधारावी अशी मागणी केली जात आहे. परंतु याकडे संबंधित प्रशासन दुर्लश करत असते.रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्यक आहे. परंतु, नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कित्येक दिवसांपासून ग्रामीण जनता या खराब रस्त्यावरून वावरत आहे. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. मात्र, ग्रामीण रस्ते दुरुस्तीची प्रतीक्षा करत आहेत.ग्रामीण भागात कित्येक दिवसांपासून रस्त्यांचा विकासाकडे पाहिले जात नाही. एखाद्या ठराविक वेळी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने रस्त्यास निधी मंजूर झाला तर मोठा गाजावाजा करतात. पत्रक काढतात, वर्तमानपत्रात बातमी छापून येतात. हे सर्व करून मोठी प्रसिद्धी केली जाते. निधीचे आकडेही लाखो-कोटीत असतात. मात्र, ही ग्रामीण रस्ते दुरुस्त करत असताना थातूरमातूर रस्त्यांची कामे केली जातात व नंतर सहा महिन्यातच रस्त्यांची दुर्दशा होते. असे थातूरमातूर रस्ते करण्यापेक्षा एकदाच संपूर्ण बजेटमध्ये रस्ते दर्जेदार करून दाखवले तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही
कित्येक वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, नागरिकांनी रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी अनेकदा केली. परंतु, त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले जाते. सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता दैनंदिन जीवन जगत असताना या खराब रस्त्यामुळे त्यांचा विकासासाठी ग्रामविकास खात्याने ग्रामीण भागातील रस्त्यांचा सर्वे करण्याचे आदेश द्यावेत. यामध्ये खरोखरच कोणत्या गावात रस्ते अथवा इतर सोयीसुविधांची खरोखरच गरज आहे हे पहावे व सर्वे करून ग्रामीण भागाचा विकास . का रस्त्यांचा विकास कधी होणार? असा प्रश्न गावातील नागरिकांकडून निर्माण होत आहे.