जामनेर येथील रुबी हॉस्पिटलमध्ये कथलॅब सुविधांचे उद्घाटन- नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
जामनेर /उपसंपादक -शांताराम झाल्टे
शहरातील रुबी हॉस्पिटल येथे कथलॅब सुविधांचे उद्घाटन झाले असून तात्काळ हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णांना ताबडतोब उपचार मिळवून त्यांचा जीव वाचवावा या माध्यमातून जामनेर येथील रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये अद्यावत कथलॅब सेवेचा शुभारंभ जामनेर शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ साधना महाजन व डॉक्टर अजय चौरसिया कारझोलॉजिस्ट बॉम्बे हॉस्पिटल मुंबई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नवल पाटील डॉक्टर अमित भंगाळे ,जळगाव रुबी स्टार हॉस्पिटल डॉक्टर गिरीश अय्यर, डॉक्टर विश्वनाथ चव्हाण ,भाजपा ज्येष्ठ नेते शंकर आप्पा मराठे,यांच्यासह मान्यवर नागरिक व रुबी स्टार रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ तिच्यावर उपचार होणार.
आता कुठच जाण्याची गरज नसल्याचे या कार्यक्रमा वेळी जामनेर नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांनी याठिकाणी सांगितले.