जामनेर येथे भ्रष्टाचार विरोधी मोर्चा (दिल्ली) च्या वतीने जिल्हा अध्यक्षपदी वैशाली चौधरी यांची नियुक्ती


जामनेर | उपसंपादक-शांताराम झाल्टे
जामनेर वाकी रोड चांगदेव नगर येथील वाचनालय कार्यलया मध्ये भ्रष्टाचार विरोधी मोर्चां (दिल्ली) ची बैठक संपन्न झाली.
आज दि.३१ जुलै रविवार रोजी भ्रष्टाचार विरोधी मोर्चा दिल्ली ची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांच्या अध्यक्षते खाली पार पाडण्यात आली .

या बैठकीत पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले असून कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविणे , अन्याया विरोधात खंबीरपणे उभे राहणे, व जन हिताचे कामं करण्याबाबत सांगितले. याठिकाणी जळगांव जिल्हा महीला अध्यक्ष पदी वैशाली विलास चौधरी यांची निवड करण्यात आली असता जळगांव जिल्हा उपाध्यक्ष पदी संतोष भगत महीला जामनेर शहर अध्यक्ष पदी महीला निलम मुळे यांची निवड करण्यात आली. या बैठक प्रसंगी भ्रष्टाचार विरोधी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल जी गंगावणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. संपन्न झालेल्या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा संपर्क प्रमुख कविता कोळी , जिल्हा उपाध्यक्ष संतोष भगत , जिल्हा संघटक गजानन जी , सदस्य आकाश विरघट , दादाराव सावळे , कुणाल सुरळकर , रेखाताई पोळ ,ज्योती इंगळे , पल्लवी इंगळे, अंजनाबाई खोडपे , सविता वाघ , भाग्यश्री पाटील , सुनीता सुर्यवंशी व इतर कार्यकर्ते बैठकिला हजर होते.नवीन निवड झालेल्या पदाधिकार्यांचे अभिनंदन तसेच कौतुक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहूल जी गंगावणे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे जामनेर शिवसेना शहराध्यक्ष अतुल सोनवणे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमा ठिकाणी पत्रकारांचा सुद्धा सत्कार कार्यक्रमात करण्यात आला होता सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालण रविंद्र सुर्यवंशी आणि आभार प्रर्दशन चौधरी यांनी केले.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment