झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण

जळगाव खुर्द जवळील घटना

झोपेत अंगावरून वाहन गेल्याने तीन मजूर जागीच गतप्राण

जळगाव खुर्द जवळील घटना

जळगाव प्रतिनिधी

कामाच्या ठिकाणी दिवसभर काम करून थकलेल्या तीन मजुरांच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने यात तिघे जण ठार झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव खुर्द गावाजवळील पुलानजीक उघडकीस आली . या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सिकंदर नाटूसिंग राजपूत, भुपेंद्र मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर (सर्व राहणार उत्तर प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत .

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू होते. येथे सिकंदर नाटूसिंग राजपूत, भुपेंद्र मिथीलाल राजपूत आणि योगेश कुमार राजबहाद्दूर हे तिन्ही मजूर रात्री लोखंडी पट्टीवर झोपलेले असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अंधारामुळे वाहनचालकाला मजूर दिसले नसल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची नोंद घेऊन पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaonaccidentCrime
Comments (0)
Add Comment