भुसावळ : प्रतिनिधी
नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्समधील रहिवाशी ठेकेदाराला तीन जणांनी धमकावत चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश अशोक नरोटे (वय-२९, रा. गुलमोहर कॉलनी भुसावळ ) हे गर्व्हमेंट कॉट्रॅक्टर आहेत. योगेश नरोटे यांचे शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्स येथे ऑफीस आहे. २५ ऑक्टोबररोजी नरोटे हे त्यांच्या ऑफीसमध्ये असतांना दिपक भास्कर राणे, पवन मेहरा (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती असे तिघेजण दुपारी आले.
“तुला या ठिकाणी राहायचे असेल तर तुझ्या मामाकडून आम्हाला १५ लाख रूपये द्यावे लागतील. तुम्हाला खोट्या केसमध्ये फसवून जेलमध्ये टाकू” असे धमकावले आणि चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. योगेश नरोटे यांनी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो उ नि गणेश धुमाळ करीत आहेत .