अमळनेर:- आजच्या फोनाफोनीच्या व कम्प्युटरच्या युगात आपण सारे, विशेषत: विद्यार्थी, आज वाचन व लेखन विसरत चाललो आहोत... ही संस्कृती टिकवून रहावी व गतकाळातील चांगल्या प्रथा पुढेही सुरु राहाव्यात म्हणून माझ्या कंकराज शाळेत मी गेल्या आठवड्यात वाचन प्रेरणा दिवसाचे निमित्त साधून, नुसत्या वाचनाचेच नाही तर 'वाचनातून लेखनही समृद्ध व्हावे' या हेतूने विद्यार्थ्यांकडून *मामाला पत्र लिहिण्याचा, 'पत्रलेखन' हा उपक्रम राबविला.* विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड आणून देऊन पत्रलेखन करवून घेतले. ५० पैशाचे साधे 'पोस्टकार्ड' किती जणांना आनंद देऊ शकते, याचा मला या आठवड्यात प्रत्यय आला! पत्रलेखन करण्याचा विद्यार्थ्यांना आनंद!, माझ्या पाल्याने पत्र लिहिले याचा पालकांना कोण आनंद!!, तर माझ्या नातवंडाचे मला पोष्टाने पत्र आले... याचा मामाच्या कुटुंबात आनंद...!!! व्वा! विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावाला तर जाणारच आहेत, पण त्यापूर्वी त्यांनी आजोळी पत्र पाठवून सगळ्यांनाच 'आश्चर्याचा धक्का' दिला!! त्यामुळे विद्यार्थ्यांना आजोळी भरपूर फटाके व महागड्या कपड्यांची भेट तर मिळेलच! शिवाय कौतुक होईल ते वेग
ळेच!!विद्यार्थ्यांना पत्रलेखनाचे महत्त्व समजावे व त्यांचे लेखन समृद्ध व्हावे यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न कंकराज ता.पारोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सातीलला पाटील यांनी केला.