एकाद्या व्यक्तीचा मृत्यु ही खुप दु:खद घटना असते. त्यामुळे अंतयात्रेवेळी सर्वजण शांत असतात. पण अनेकदा काही विचित्र अंतयात्रेही आपल्याला बघायला मिळत असतात. अशीच एक अंतयात्रा बिहारमध्ये काढण्यात आली आहे.
बिहारमध्ये एका व्यक्तीने आपल्या वडिलांची अंतयात्रा थेट वाजत गाजत काढली आहे. १०४ वर्षांच्या आपल्या वडिलांना दिलेला अखेरचा निरोप अविस्मरणीय असावा म्हणून त्या व्यक्तीने डान्सर आणि ऑर्केस्ट्रा बोलवत वाजत गाजत यात्रा काढली आहे.
सामान्यापणे जेव्हा एकाद्या व्यक्तीचा मृत्यु होता, तेव्हा सगळीकडे शोकाचे वातावरण असते. पण बिहारमध्ये एका कुटुंबाने हे सर्व लक्षात राहावं म्हणून आनंदात साजरे केले आहे. आपल्या वडिलांच्या अंतयात्रेत मुलगा चक्क भोजपुरी गाण्यावर डान्स करत होता.
१०४ वर्षांचे असणारे भोला यादव यांचा रविवारी मृत्यु झाला होता. त्यानंतर त्यांच्या मुलाने आणि कुटुंबियांनी वाजतगाजत त्यांची अंतयात्रा काढली. या अंतयात्रेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लोक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर भोजपुरी गाणयावर डान्स करताना दिसत आहे. तर खाली मृदेहाला खांदा देत असलेले लोकही डान्स करताना दिसून येत आहे. ही अंतयात्रा साधपूरपासून निघाली आणि डुमाईगडच्या स्मशानभुमीत पोहचली.
गाण्यावर नाचत असताना एकाच्याही चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हते.विशेष म्हणजे कुटूंबातील सदस्यही हसत खेळत आणि डान्स करत वृद्धाला निरोप देत होते. या अंत्यसात्रेत शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता. या अंतयात्रेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे.