पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे स्वागत

शिर्डी, ;– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी आज भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले.
यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

बातमी शेअर करा !
Animal HusbandryChief Minister Eknath ShindeDairy Development Minister and District Guardian Minister Radhakrishna Vikhe-PatilDeputy Chief Minister Ajit PawarDeputy Chief Minister Devendra FadnavisGovernor Ramesh BaisPrime Minister Narendra ModiRevenue
Comments (0)
Add Comment