मुंबई : राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल. 7 व 8 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल, त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरीला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असल्याचे के.एस होसळीकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रविवारी आणि उद्या सोमवारी मुंबई आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी दोन्ही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 9 सप्टेंबर रोजी मुंबईला येलो तर पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.