बिग ब्रेकिंग : पिंपळकोठ्याजवळ भीषण अपघातात

जळगाव | प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारमधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली . 

याबाबत माहिती अशी की , एरंडोलकडून जळगावकडे जात असलेल्या कार क्रमांक ( एमएम १ ९ सीझेड ७३६० ) पिंपळकोठ्याजवळ पुढे जात असलेल्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने कार मधील चार जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाले आहे . दरम्यान मयतान मध्ये एरंडोल येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत असलेले फार्मसिस्ट जयदीप मदनसिंग राजपूत वय वर्षे 35 राहणार एरंडोल चतरसिंग पदमसिंग परदेसी वय वर्ष 40 राहणार जामठी विजय हरी परदेशी वय वर्षे 60 राहणार जामठी आबा पैलवान.
अपघात इतका भीषण होता की कारमध्ये मयत झालेले व्यक्तींना बाहेर काढणे कठीण झाले होते . क्रेनच्या मदतीने कार ट्रकमधून काढण्यात आली.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment