अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात कोरोनापेक्षाही भयंकर प्रेमाच्या नावाखाली पळून जात लग्न करण्याचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने तब्बल १५ दिवसात डझनभर तरुण आणि तरुणी बेपत्ता होऊन विवाह करून परतले आहेत. यात कळस म्हणजे काही विवाहितांचाही यात समवेश असल्याने समाजमन सुन्न होत आहे. तळहाताच्या फोटाप्रमाणे जपलेल्या पोरी भलत्याच्याच नादात लागून आपले आयुष्य बरबाद होताना आईवडिलांचे काळीज तुटत असतानाही कायद्याच्यापुढे ते हातबल हो आहेत. म्हणूनच मुला-मुलींनी प्रेमविवाह करताना तेथे आईवडिलांची उपस्थित अनिवार्य करावी, अशी आर्त हाक पिडित आईवडिलांकडून टाहो फोडून दिली जात आहे. यासाठी आता एक मोठी सामाजिक चळवणच उभी राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
अमळनेर शहरातील आणि तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या डायरीचे पाने चाळली असता १ ते १५ सप्टेंबर दरम्यान तब्बल १२ तरुण व तरुणी पळून गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुलांना अमर्याद दिलेले स्वातंत्र आणि त्याच्या स्वयराचाराने होत असलेला वापर आहे. त्यात त्याला कायद्याची मिळणारे बळही आहे. कायदे हे पुरक असावेत. ते मारक नसावेत. काल, स्थप परत्वे त्यात सुधारणा होणे आवश्यक असतानाच नेमक्या याबाबींकडे दुर्लक्ष होत असल्यानेच चंगळवाद अधिक वाढला आहे. याचा फटका मात्र कुटुबीयांना सहन करावा लागत आहे.खबरीलाल
असे झाले आहेत बेपत्ता…
तालुक्यातील पिंपळे येथून २८ वर्षीय भूषण देविदास पाटील १४ रोजी सकाळी ७ वाजता तर २० वर्षीय तरुणी १३ रोजी दुपारी दीड वाजता घरातून निघून गेले आहेत. तर तालुक्यातील निमझरी येथील २३ वर्षीय तरुणी १४ रोजी दीड वाजता घरातून निघून गेली. ढेकू रोड वरील देशमुख नगर मधील एक तरुणी १३ रोजी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास निघून गेली आहे. चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी येथील २३ वर्षीय तरुण पवन कैलास पाटील ९ रोजी सकाळी दहा वाजता अमळनेर बसस्थानकावरून बेपत्ता झाला आहे. शारदा कॉलनीतील २२ वर्षीय विवाहिता २ रोजी दुपारी साडे बारा वाजता घरातून निघून गेली तर शनिपेठ पैलाड येथील २३ वर्षीय तरुणी १ रोजी रात्री ८ वाजता घरातून निघून गेली आहे.
पालकांची चिंता वाढली…..
त्याचप्रमाणे पोलिसांत दाखलबरोबरच तालुक्यातील आणखी काही तरुण तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची माहिती पुढे येत आहे.: खबरीलाल-: परंतु आब्रुचा फालुदा नको म्हणून पालकांनी पोलिसांत माहिती देणे टाळले आहे. तर त्यातील काही तरुण तरुणी विवाह करून परतले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस देखील तीन ते चार तरुण तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद आहे. गेल्या महिन्यात महिनाभरात १२ तरुण तरुणी पळाले होते. मात्र या महिन्यात ती संख्या २० च्या आसपास झाली आहे. यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.