जळगाव | प्रतिनिधी
शहरातील बी.जे. मार्केट मधील खताच्या दुकानाला बुधवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना उघडकीला आली आहे. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली.
शहरातील बी.जे. मार्केटमधील श्री राम समर्थ ऍग्रो नावाने दुकान आहे. याठिकाणी रासायनिक खते, बि-बियाणे, किटक नाशक विक्री केली जाते. बुधवारी १६ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. ही घटना मार्केटमधील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशामन विभागाला माहिती दिली.
दरम्यान, अग्निशमन विभागाचा बंब अवघ्या काही मिनिटाच घटनास्थळी दाखल झाला. या बंबाने पाण्याचा मारा केल्यानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत दुकानाच्या वरच्या मजल्यावर ठेवलेले खते व बि-बियाणे जळून खाक झाले असून त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात आगीची नोंद करण्याचे काम सुरु होते.