‘मला काही झालं तर, नाना पाटेकर’ आणि…अभिनेत्री तनुश्री दत्ताची पोस्ट चर्चेत

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : ‘आशिक बनाया आपने’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता चित्रपटांपेक्षा मी टू प्रकरणामुळेच जास्त चर्चेत राहिली. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैर वर्तन केल्याचा दावा तिने केला होता. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीत “मी टू” चळवळीला तिने सुरुवात केली. मधला बराच काळ या प्रकरणाला लोटून गेला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केल्याचे दिसून आले आहे. तशी तिने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे जी चर्चेत आहे.

अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तनुश्री दत्ताने पोस्ट करीत म्हटले आहे कि, ‘जर मला कधी काही झाले तर याला #metoo आरोपी नाना पाटेकर, त्याचे वकील आणि सहकारी आणि त्याचे बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार आहेत! कोण आहेत बॉलिवूड माफिया?? तेच लोक ज्यांचे नाव एसएसआर (सुशांतसिंग राजपूत) मृत्यू प्रकरणात वारंवार समोर आलेत.” (लक्षात घ्या की, सर्वांकडे एकच फौजदारी वकील आहे). त्यांचे चित्रपट बघू नका, त्यांच्यावर पूर्णपणे बहिष्कार टाका आणि दुष्ट सूडबुद्धीने त्यांच्या मागे जा. इंडस्ट्रीच्या सर्व चेहऱ्यांना आणि पत्रकारांना सामोरे जा, ज्यांनी माझ्याबद्दल खोट्या बातम्या पेरल्या आणि पी.आर.च्या लोकांबद्दलही मोहिमा राबवा. सर्वांच्या मागे लागा!! त्यांचे जीवन एक जिवंत नरक बनवा कारण त्यांनी मला खूप त्रास दिला! कायदा आणि न्याय अपयशी ठरले असतील, पण या महान राष्ट्राच्या लोकांवर माझा विश्वास आहे. जय हिंद… आणि बाय! फिर मिलेंगे”.

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने २०१८ साली अभिनेता नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तर प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर ही तिने केस दाखल केली होती. २००८ साली आलेल्या ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता. यामुळे ती चर्चेत आली होती. या चित्रपटाच्या एका गाण्याचे चित्रीकरण करताना नानांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचे तिने म्हटले होते. तर नानांनी आणि इतर सहकलाकारांनी या आरोपाचा निषेध केला होता.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment