मिराचे पळासखेडे येथे गुरांवर पडलेल्या लंम्पी आजाराची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली पाहणी
मि.पळाखेडे/प्रतिनिधी-प्रकाश पाटील
गुरांवर पडलेल्या लंम्पि आजारांमुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्या मुळे आज दि.१३ सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक्ष घरोघरी जाऊन गुरांच्या अंगावर झालेल्या गांठीची पहाणी केली आहे.
याठिकाणी
गुरांची पाहणी करण्यासाठी मा.श्री बाळासाहेब मोहन सर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ,जि.प.जळगाव श्री. सिसोदे सर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , तसेच नेरी येथील डॉ. श्रीकांत व्यवहारे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मिराचे पळासखेडे येथे भेट दिली असता
रात्री 11 वाजे पर्यंत पशुवैद्यकीय अधिकारी आपली सेवा बजावत असून शेतकऱ्यांना योग्य रितीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे.
तपासणी करतेवेळी उपस्थित गावातील सरपंचाचे चिरजीव मंगल राजपूत, उपसरपंच रविंद्र हडप,आणी नागरिक उपस्थित होते.