मुंबई | वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट आहे. हे संकट काहीसे कमी होत असताना मात्र आता ओमिक्रॉनचा धोका निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी देशाचे याचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन पडणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
असे असताना आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. डोंबिवलीमध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आलेल्या तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे तपासणीतून सिद्ध झाले आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.
या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. देशातील चौथा ओमायक्रॉनचा रुग्ण आहे. याआधी कर्नाटकमध्ये दोन आणि गुजरातमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटचा एक रुग्ण आढळला होता. यामुळे आता हे संकट देखील वाढत चालले आहे.
या तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. सध्या या तरुणाला फक्त सौम्य लक्षणं आढळली आहेत. कल्याण डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये तरुण उपचार घेत आहे. कोरोनाचा ओमिक्रॉनचा व्हेरिएंट सध्या संपूर्ण जगाची चिंता बनला आहे.
सुरुवातीला कर्नाटकामध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आलेत. तर आता कर्नाटकमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून आलेला एक रूग्ण फरार झाला आहे. हा रूग्ण ओमायक्रॉनग्रस्त असून रिपोर्ट येण्याआधीच तो पसार झाला आहे.
दरम्यान, कोरोनामुळे अधिक देशाची आर्थिक घडी मंदावली आहे. यामुळे आता या नवीन संकटाशी दोन हात करताना मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या देशाला आणि कोणत्या राज्याला संपूर्ण लॉकडाऊन करणे परवडणार नाही. जगभरातील एकूण 25 देशांमध्ये याचे रुग्ण आढळून आल्याचे सांगितले जात आहे.