रणबीरआलियाचे यंदा कर्तव्य!

दोघांच्या कुटुंबियांनी गपचूप लग्नाची तयारी करायला घेतल्याचे देखील समजते.

अभिनेत्री लारा दत्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यातील नात्याबद्दल खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लाराने सांगितले की, रणबीर आणि आलिया यावर्षीच लग्न करणार आहेत. रणबीर-आलिया बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या दोघांच्या लग्नाबाबत गेल्या दोन वर्षांपासून अंदाज बांधले जात आहेत. चाहतेही त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लारा दत्ता म्हणाली, “मला वाटते की रणबीर आणि आलिया यार्षीच लग्न करू शकतात.” ती पुढे म्हणाली की, मी आता जुन्या पिढीतील झाली आहे आणि म्हणूनच सध्या कोणते बॉलिवूड कपल डेट करत आहेत, हे देखील मला माहित नाही. शिवाय कोणते कपल आता सोबत नाहीत, याचीही कल्पना नाही, असेही लाराने सांगितले.

4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया 4 वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. असे म्हटले जाते की, दोघे गेल्या वर्षी लग्न करणार होते, पण कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले. रणबीरने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर कोरोना व्हायरस नसता तर कदाचित त्याने आलियाशी आधीच लग्न केले असते.

रणबीर आणि आलिया एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर ती त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे रणबीरदेखील अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत चिल करताना दिसतो.

रणबीर-आलिया जोडी ‘ब्रह्मास्त्र’मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार
लवकरच रणबीर-आलिया ही जोडी अयान मुखर्जीच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. रणबीर-आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे.

बातमी शेअर करा !
alia bhattlara duttranbir kapoor
Comments (0)
Add Comment