अमळनेर :- येथील सुनंदा पार्क भागातील रहिवाशी सुरेश पाटील व सुनील पाटील निंभोरेकर यांनी आपल्या मातोश्री स्व मिराबाई लटकन पाटील यांच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ विविध समाजोपयोगी उपक्रम केले.
राज्य परिवहन मंडळीच्या कर्मचारयांचा पगार गेल्या चार महिन्यां पासून होत नव्हते. त्यांच्या साठी संसारा साठी किराणा किट,वरणेश्वर मंदिरास वृक्षारोपणसाठी आर्थिक मदत, लोंढवे येथील एस एस पाटील माध्यमिक विद्यालयास शैक्षणिक साहित्य जतन करण्यासाठी अग्निशमन यंत्रे देण्यात आली. निंभोरा येथिल जिल्हापरिषद शाळेला आर्थिक मदत करण्यात आली.
स्व मिराताई यांचे पती लटकन पाटील यांनी सदर संस्था प्रमुख यांना सन्मानपूर्वक बोलऊन वरील साहित्य व देणगी सुपूर्त केल्या.
यावेळी लोंढवे शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील,मिलिंद पाटील,महेश पाटील,दिनेश पाटील,आर पि पाटील व इतर सहकारी उपस्थित होते. वरणेश्वर मंदिर संस्थानतर्फे सुभाषआण्णा चौधरी, एकनाथ चौधरी ,प्रा प्रभाकर जोशी,गोकुळ पाटील,लोटन पाटील, एस टी कर्मचारयांच्या वतीने किरण धनगर ,पी एल चौधरी, आर. जि. संदानशिव, नितीन पाटील,जि.एल.पाटील आदी उपस्थित होते.