राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार

 

मुंबई । प्रतिनिधी

कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या एक  दीड  वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील  शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. येत्या १ डिसेंबरपासून २०२१ राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग सुरू होणार आहेत.आता राज्यातले ज्या शाळा आता ऑनलाईन होणाऱ्या होत्या त्या आता ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत.

मुंबई – कोरोनाच्या फैलावामुळे गेल्या एक दीड वर्षापासून बंद असलेल्या राज्यातील शाळांची घंटा अखेर वाजणार असून . येत्या १ डिसेंबरपासून २०२१ राज्यातील पहिलीपासूनचे शाळांचे वर्ग आता सुरू होणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत ऑनलाईन भरणारे राज्यातील शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग आता प्रत्यक्ष मुलांच्या उपस्थितीने गजबजणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा पसरण्याचा प्रभाव खूप कमी झाला आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. अशा अनुकूल परिस्थितीत राज्यातील शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल असल्याचा अंदाज घेऊन राज्य सरकारने १ डिसेंबरपासून राज्यातील शाळांचे पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला असून

दरम्यान, राज्यातील माध्यमिक शाळांचे वर्ग काही दिवसांपूर्वी सुरू होताना दिसून आले . त्यानुसार आठवी ते दहावी तसेच ११ वी १२ वीचे वर्ग सुरू झाले होते. मात्र लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून पहिली ते सातवीचे वर्ग अद्यापही सुरू झालेले नाही . मात्र आता हे वर्ग सुरू होणार असून आता कोरोनाची लाट कमी होताना दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यातील शाळांचे बहुतांश वर्ग बंद होते. मात्र आता राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व वर्ग सुरू होताना दिसून येणार आहे , शाळेमध्ये सुरक्षित आणि आरोग्यमय वातावरण देण्याचा आमचा प्रयत्न असणार . तसेच शाळा सुरू झाल्यावर घ्यावयाची खबरदारी आणि नियमावलीबाबत आम्ही येत्या आठ दिवसांमध्ये निर्णय घेणार आहोत, अशी माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली.

 

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment