मेष: दिवस संमिश्र असेल. भविष्याची फार चिंता करू नका. नातेवाईकांशी मन मोकळेपणाने बोलाल. सकारात्मक विचारांची जोड घ्यावी. उगाचच निराश होऊ नका.
वृषभ: जोडीदारासोबत प्रेमळ क्षण घालवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आनंददायी अनुभव येतील. भागीदारीत फार विसंबून राहू नका. आजचा अंतिम निर्णय तुमचा असेल.
मिथुन: आज कामाचा थकवा येईल. परंतु आळस झटकून कामाला लागावे. उगाच उदास होऊ नका. कोणावरही अतिविश्वास ठेऊ नका. मतभेदाला बळी पडू नका.
कर्क: उगाचच रेंगाळत बसून राहू नका. वेळेचा सदुपयोग करावा. एखादे चांगले पुस्तक वाचनात येईल. आवडता छंद पूर्ण करता येईल. जुगारापासून सावध राहावे.
सिंह: मनात शंकेला थारा देऊ नका. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा. शैक्षणिक अडचणी दूर होतील. काही नवीन खरेदी करता येईल. घरात टापटीप ठेवाल.
कन्या: जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रवासाचा सुखद अनुभव घ्याल. दुचाकी वाहन जपून चालवावे. शंकेचे समाधान करून घ्याल. नसते साहस दाखवायला जाऊ नका.
तूळ: मोकळ्या स्वभावाने लोकांचे मन जिंकाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जुन्या कामातून लाभ संभवतो. इच्छे विरुद्ध प्रवास करावा लागू शकतो. कौटुंबिक गैरसमज टाळावेत.
वृश्चिक: अति संवेदनशीलता दाखवू नका. वाईट गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. आपलेच मत खरे कराल. नवीन मार्गांचा विचार कराल.
धनू: आजचा दिवस सामान्य असेल. भावांकडून मदत मिळेल. कोणावरही विसंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवावे. मोहाळा बळी पडू नका.
मकर: आपल्या क्षमतेचा योग्य वापर करावा. खरेदी करताना सावध राहावे. मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. प्रवासात काळजी घ्यावी.
कुंभ: कार्यालयीन कामात गोंधळ उडू शकतो. चित्त स्थिर ठेवावे. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. व्यवसायिकांनी नवीन धोरण आखायला हरकत नाही. एकावेळी अनेक कामे हाताळू नका.
मीन: भाग्याची चांगली साथ मिळेल. नवीन गुंतवणूक करता येईल. त्यातून चांगला नफा मिळेल. नातेवाईकांची भेट आनंद देणारी असेल. आध्यात्मिक प्रगती करता येईल.