दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, दोघेही आपापल्या स्तरावर अशा अनेक योजना राबवतात, ज्यांचा लाभ गरजू आणि गरीब घटकांपर्यंत पोहोचू शकतो. या योजना ग्रामीण भागात आणि शहरी भागात वेगळ्या पद्धतीने चालवल्या जातात. यामध्ये विद्यार्थी, पुरुष, वृद्ध आणि महिला अशा प्रत्येक वर्गासाठी योजनांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना नावाची योजना चालवली जाते. महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही, आणि तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाते. परंतु अर्ज करण्यापूर्वी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्या महिलांना ते मिळू शकते आणि कोणाला नाही. चला तर मग त्याबद्दल जाणून घेउया…
कोण कोण अर्ज करू शकतात ?
ही योजना केंद्र सरकारने देशातील प्रत्येक राज्यात 50 हजार महिलांसाठी योजली आहे. या योजनेसाठी अर्ज करणार्या महिला 20 ते 40 वर्षे वयोगटातील असाव्यात. महिलांनी अर्ज केल्यावर त्यांना विनामूल्य शिवणकाम मशीन मिळते. यासाठी ती व्यक्ती भारताचा नागरिकअसणे अनिवार्य आहे. देशातील केवळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
कोणकोणत्या राज्यात चालू आहे योजना ?
पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजना सध्या कर्नाटक, हरियाना, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे राबवली जात आहे. या राज्यांमधील महिला या योजनेचा अधिकाधिक फायदा घेऊ शकतात.
हि योजना कोण कोणाला लागू होते ?
महिलेच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच, विधवा आणि अपंग महिला देखील या योजनेसाठी पात्र होऊ शकतात.
पात्रता :-
अर्जदार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विधवा आणि दिव्यांग महिला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि लाभ घेऊ शकतात.
हि कागदपत्रे असणे आवश्यक आहे..
ऑफलाईन करू शकता अर्ज…
आपण या प्रकल्पासाठी ऑनलाइन अर्जही करू शकता. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची इच्छा असलेल्या महिलेला www.india.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
फ्री सिलाई मशीन योजना अर्ज | येथे क्लिक करा |
परंतु, आपण सगळ्यात सोपी ऑफलाईन पद्धत जाणून घेउया..
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जिल्हा / तालुका / नगरपालिकेत महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन अर्ज करू शकता. अर्ज भरून अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज जमा करावा व अर्जाची पोचपावती घ्यावी. संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कळवण्यात येईल व शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात येईल !