शिरुड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा

आज शिरुड येथील श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील तर उद्घाटक शाम बापू अहिरे हे होते.
उपस्थित गावकरी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्रीदत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील, उद्घाटक ाजी सभापती श्‍याम बापू अहिरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी चे संचालक जयवंतराव पाटील यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी ए धनगर यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी शिवाजी महाराजांच्या कार्याचा उजाडा मान्यवरांनी दिला. शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात त्यांच्याशी गद्दारी करणारे कावेबाजपणा करणारे फंदफितुरी करणारे यांची हालत काय झाली व त्याचे परिणाम काय झाले हे सर्व समाजाला मान्यवरांनी पटवून दिले. शिवाजी महाराजांची थोरवी गाताना प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येईल हेच या कार्यक्रमाचे फलित होते. सर्व उपस्थितांचे बाहू स्फुरण पावावे व या रयतेच्या राजाच्या आचार विचारांनी आपण चालले पाहिजे याची शाश्वती प्रत्येकाला आली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीदत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले.
यावेळी भालेराव पाटील, सुभाष महाजन, महेंद्र पाटील, रवींद्र पाटील, बळिराम धनगर, ताथू धनगर, नवल बैसाने, रंगराव पाटील, विजय पाटील, आधार धनगर, शामराव महाजन, बापू अहिरे, हरी बोरसे पोपट दौलत पाटील, साहेबराव देवराम पाटील माणिक धनगर, रंगराव पाटील, रघुनाथ धनगर अशोक सुपेकर, साहेबराव देवराम पाटील ओंकार पाटील अविनाश राजेंद्र पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment