शेतीचे कामावरुन एकाचा गळा आवळला

मेहुणबारे पोलीस स्टेशनला एका विरोधात गुन्हा दाखल

चाळीसगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील उपखेडे येथील एकाचा शेतीचे काम रोटाव्हीटर  करण्यास नकार दिला. म्हणून शेतमालकाने लुंगीने गळा आवळल्याची घटना सेवानगर येथे घडली आहे. प्रसंगावधान राखत इतराने मध्यस्थी केल्याने, शेतमजुराचे थोडक्यात प्राण बचावले. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील उपखेडे येथील रहिवाशी समाधान प्रल्हाद पवार यांचा शेती आणि ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. दि,४ रोजी उपखेडे जवळच असलेले सेवानगर तांडा येथील रहिवाशी विजय हरी राठोड याने त्यांच्या शेतात ट्रॅक्टरव्दारे  रोटाव्हीटर मारण्याचे काम सांगीतले होते. परंतू समाधान पवार यांना गावी जायचे असल्याने त्यानी कामास नकार दिला. व त्यांचे पैसे परत केले.

याचा राग आल्याने विजय राठोड याने दारुच्या नेशत समाधान यांना रस्त्यात आडवले. व कामास नकार दिल्याच्या कारणावरुन वाद घातला, तसेच दगड मारुन पेकला व नतंर लुंगीच्या साह्याने त्यांचा गळा आवळा, ते बेशुध्द होत असताना नथ्थू भिला राठोड, रविंद्र अर्जन पाटील हे धावत आले, व समाधान यास सोडवले.

समाधान यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानतंर मेहुणबारे पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली. त्यांच्या फिर्यांदीवरुन मेहुणबारे पोलीस स्टेशनला  विजय राठोड यांच्या विरोधात भादवी कलम ३०७, ३४१, ३२४ प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment