दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क : श्रावण सोमवार पुजा आणि व्रत नियम सध्या श्रावण महिना सुरु असून 1 ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे. महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण करावे. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची विशेष पूजा करावी. या उपायाने महादेवाची कृपा प्राप्त होते. महादेवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. जीवनातील अडचणी दूर होतात. येथे जाणून घ्या सोमवारी महादेवाची पूजा करण्याचा सामान्य आणि सोपी विधी…
श्रावण मासात कठोर व्रत-नियम पालन करणे शक्य नसल्यास काही सोप्या विधी द्वारे पुण्य कमावता येतं.
सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरीच व्रत करण्याचा संकल्प करावा. संकल्प घेतल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचे दुध अर्पण करावे. नंतर पांढऱ्या रंगाची फुले, अक्षता, पंचामृत, बेलाचे पान अर्पण करावे. प्रथम श्रीगणेशाची आरती करा, नंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची आरती करा. या सर्व गोष्टी अर्पण करताना शिव मंत्र – ॐ महाशिवाय सोमाय नम: किंवा ॐ नम: शिवाय। या मंत्राचा जप करा. श्रावण सोमवारची कथा करावी. संध्याकाळी व्रताचे पारायण करावे. एकाजागी बसून सात्त्विक भोजन करावे. दिवसा फळांचे सेवन करु शकता. तामसिक आहाराचे त्याग करावे. टॉमेटो, वांगी खाणे टाळावे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपास करण्याचा महत्व आहे. प्रत्येक सोमवारी महादेवाला अभिषेक करून काळे तिळ वाहावे. जप करण्यासाठी रुद्राक्षाची माळ श्रेष्ठ ठरते. या सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करू शकता.
श्रावण मध्ये या गोष्टी करू नका
- दुधाचा अनादर करू नका.
- शिवलिंगावर हळद, सिंदूर अर्पण करू नये.
- सोमवार व्रत करणाऱ्या लोकांनी सात्विक अन्नच खावे.
- कोणाचाही अपमान करू नका.
- अंगाला तेल लावू नये.
- प्राण्यांचा छळ करू नका.
- भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशी आणि केतकीच्या फुलांचा वापर करू नये.