संविधान आर्मी जामनेर तालुका अध्यक्ष पदी महाराष्ट्र जनता न्यूजचे संचालक दादाराव वाघ यांची नियुक्ती
जामनेर/उपसंपादक दि-२५/शांताराम झाल्टे:-जामनेर येथील एम. जे. न्युजचे पत्रकार तथा संचालक-दादाराव वाघ यांची नुकतीच संविधान आर्मी जामनेर तालुका अध्यक्ष पदी संस्थापक अध्यक्ष-जगन भाई सोनवणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन आज रोजी निवड करण्यात आली आहे. यावेळी संविधान आर्मीचे संस्थापक अध्यक्ष-जगन भाई सोनवणे, संविधान रक्षक सैनिक महिला अध्यक्षा-सौ.पुष्पाताई सोनवणे,प्रदेशाध्यक्ष-राकेश भाई बग्गन,राष्ट्रीय संघटक-समद भाई कुरेशी, यांच्या आदेशानुसार जामनेर येथील पत्रकार, महाराष्ट्र जनता न्युज चे संचालक, तसेच निर्भीड पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव, व आपल्या लेखणी द्वारे अन्यायाला वाचा फोडणारे तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवून त्यांना मार्गदर्शन करणारे जामनेरचे दादाराव वाघ यांची संविधान आर्मी संघटनेच्या वतीने जामनेर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष-जगन भाई सोनवणे यांनी दादाराव वाघ यांना नियुक्ती पत्र दिले आहे. नियुक्ती पत्र मिळाल्या नंतर वाघ यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, संघटन वाढ,तसेच तळागाळातील नागरिकांना त्यांचे हक्क,व अधिकार काय असतात हे पटवून देणार,सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व त्यांच्या प्रश्नांसाठी संवैधानिक पध्दतीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल,प्रसंगी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनआंदोलनाचा लढा उभारण्याचा प्रयत्न करेल. ""संविधान आर्मी की क्या पहचान,एक हात तिरंगा एक हात मे संविधान.. संविधान के सन्मान मे,संविधान आर्मी मैदान मे.."" अशी घोषणा देत मनोगत व्यक्त केले..आणि याठिकाणी पद मिळताच जामनेर निर्भिड संघटनेचे पत्रकारांनी दादाराव वाघ यांचे स्वागत केले आहे.