पाऊस पडायला लागला की आठवतं गरम गरम मक्याचे कणीस, उकडलेले मक्याचे दाणे व त्यावर भुरभुरलेलं चाट आवडीने खातो. कॉर्न पॅटीस, कॉर्न सूप, कॉर्न पुलाव असे वेगवेगळे पदार्थ चवीने खाल्ली जातात. त्यात भर म्हणजे “मक्के की रोटी आणि सरसो दा साग’ला विसरून कसे जमेल? मक्यामध्ये व्हिटॅमिन, फायबर, अँटी ऑक्सिडंट हे पोषक तत्व असतात.
1. मक्या मध्ये व्हिटॅमिन अ आणि कॅरोटेनॉइड्स असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतात.
2. मक्या मध्ये फायबर्स, बायोफ्लेवोनॉइड्स असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करते.
3. मक्या त मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस असते. जे अर्थिराईटीस आणि ऑस्टियोपोरोसीस यापासून संरक्षण करते. 4. मक्या त कार्बोहैड्रेट मुबलक असतात.
5. मक्या त फायबर असतात ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते.
6. मका खाल्याने आपले दात मजबूत बनतात. लहान मुलांना मका खाण्यास द्यावे.
7. गरोदर महिलांनी मका खावे. मक्यात फॉलिक ऍसिड भरपूर असते.
8. टी.बी. च्या रुग्णांनी मक्याचा आहारात समावेश करावा.
9. मक्यात कॅलरी व कार्ब्स भरपूर असतात जे वजन वाढी साठी मदत करते.
10. मक्या त 59 ग्रॅम कॅलरीज, 2.1ग्रॅम प्रोटीन, 10.4ग्रॅम कार्ब्स असतात.
डॉ. आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर