10वी, 12वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा संपूर्ण Timetable अन् Result डेट…

मुंबई | वृत्तसंस्था  

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 10वी, 12वी च्या परीक्षांचं संपूर्ण वेळापत्रक टाइम टेबलसह जाहीर करण्यात आलं आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे.

यापूर्वी शालेय मंडळाकडून 12वी ची लेखी परीक्षा 4 मार्च 2020 ते 7 एप्रिल 2022 या दरम्यान तर 10वी ची बोर्डाची परीक्षा 15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022 तर 10वीच्या प्रात्यक्षिक अन् तोंडी 25 फेब्रुवारी ते 14 मार्च कालावधीत तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या.

परंतु आता सर्व टाइम टेबलचं जाहीर केलं असून विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाइटवर जाऊन तारखेनुसार वेळापत्रक उपलब्ध करण्यात आलं आहे. हे संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.in याअधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्या नसून विद्यार्थ्यांना मुल्यमापनाच्या आधारे पास केलं होतं. परंतु आताही महाराष्ट्रावर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचं सावट पसरलं आहे. त्यामुळे परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता हा संभ्रम दूर झाला असून पेक्षा होणार असल्याचं शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे.

 

दहावी परीक्षेचं वेळापत्रक :-

  • 15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
  • 16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
  • 19 मार्च : इंग्रजी
  • 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • 22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • 24 मार्च : गणित भाग – 1
  • 26 मार्च : गणित भाग 2
  • 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
  • 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
  • 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
  • 4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2

 

निकालाची काय आहे तारीख :  इ.12 वीचा निकाल जून 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. 10वीचा निकाल जुलै 2022 च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील असंही त्या म्हणल्या. परीक्षांच्या पार्श्वभूमीवर करोनासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.

 

बातमी शेअर करा !
#news
Comments (0)
Add Comment