BREKING: अवैधरित्या उत्खनन प्रकरणी आ. खडसे यांना १३७ कोटींच्या दंडाची नोटीस

जळगाव :- मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आ. एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह ६ शेतजमीन मालकांना १३७ कोटींवर दंडाची नोटीस अवैधरीत्या १ लाख १८ हजार २०२.१५८ ब्रास मुरूमाचे उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी बजावली असून या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मुक्ताईनगर सातोड येथील एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी यांच्यासह सहा जमीनमालकांना मुक्ताईनगर तहसीलदारांनी ६ ऑक्टोबर रोजी या नोटिसा बजाविल्या आहेत. त्यानुसार अवैधरीत्या उत्खनन केलेल्या गौण खनिजाचे मूल्य २६ कोटी १ लाख १२ हजार ११७ इतके आहे.
यापोटी पाच पटींनी दंडाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार १३७ कोटी १४ लाख ८१ हजार ८८३ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आ. चंद्रकांत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात मुरूम उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला होता. खडसे परिवारातील सदस्यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर. जमिनीची खरेदी करण्यात आली असून गौण खनिजासाठी अवैध उत्खनन करीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. राज्य शासनाने यासाठी एसआयटी स्थापन केली होती. पथकाने सादर केलेला अहवाल सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaonEKNATHRAO KHADSEMANDAKINI KHADSEmuktainagar
Comments (0)
Add Comment