शिवमहापुराण कथेच्या ठिकाणी चोरांनी साधली संधी; २७ संशयित महिलांना घेतले ताब्यात

जळगाव : तालुक्यातील वडनगरी येथे आजपासून सुरु झालेल्या श्री शिवमहापुराण कथेच्या पहिल्याच दिवशी लाखो भाविकांची गर्दी उसळली होती. या गर्दीचा फायदा घेण्यासाठी चोरटे देखील सक्रीय झाले होते. यामध्ये कथेमध्ये आलेल्या दोन महिलांची मंगलपोत व एका महिलेची पर्स लांबविल्याची उघड झाले. त्यामुळे या ठिकाणी संशयितरित्या फिरतांना आढळणाऱ्या २७ महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेत तालुका पोलिसांकडे दिले आहे.

जळगाव तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी महादेव मंदिर परिसरात ५ डिसेंबरपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात झाली. कथेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून कथास्थळी जाण्यासाठी सर्वच मार्गावर मोठी गर्दी उसळली होती. सकाळपासून वाहनधारक कथास्थळी जाण्यासाठी निघाले असल्याने या मार्गावर सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याच शिवाय कथास्थळीदेखील लाखोंच्या संख्येने भाविक आलेले असल्याने तेथे देखील मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्या. तसेच सोनपोत चोरीसह चोरीच्या विचाराने संशयितरित्या काही महिला फिरत असल्याचे आढळून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २७ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांची रात्रीपर्यंत चौकशी सुरू होती.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment