“शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रिमंडळ म्हणजे भ्रष्टाचार, घोटाळेबाज, खंडणीखोरांची मांदियाळी”

मुंबई | शिंदे गट बंडखोरी करत शिवसेनेतून बाहेर पडला. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या फुटीर गटाने भाजप सोबत युती करत शिंदे सरकार स्थापन केलं. सरकार स्थापनेनंतर तब्बल 38 दिवसांनी शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला व विरोधकांनी टीकेची झोड उठवली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर सडकून टीका केली आहे.  आज महाराष्ट्रात बेकायदेशीर शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी झाला. मागील 40 दिवसांपासून विरोधकांनी आणि जनतेनी आवाज उठवला आणि यातून राज्यातील जनता आक्रोश करेल म्हणून नाईलाजाने हा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला, अशी टीका वरपे यांनी केली आहे.

हे हि वाचा….

 

मोठ्या पगाराची अपेक्षा असेल तर ‘१० वी’ नंतर करा हे कोर्स

मालदीवच्या समुद्रात उसळली ज्वालामुखी; अभिनेत्रीच्या हॉटनेसने केला कहर

 

 

या मंत्रिमंडळात सर्व चेहरे हे भ्रष्टाचार, आणि अनियमित कामांसाठी ओळखले गेलेले चेहरे आहेत. अब्दुल सत्तार हे टीईटी घोटाळ्यातील आरोपी आहेत तर संजय राठोड हे एका मुलीच्या हत्या प्रकरणात आरोपी आहेत. बोगस पदव्या, वादग्रस्त वक्तव्य, अधिकाऱ्यांना दमदाटी, महाराष्ट्र विकत घेण्याची भाषा करणारे तानाजी सावंत असे लोक मंत्रिमंडळात आहेत, असा घणाघातही वरपे यांनी केला.

दरम्यान, स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या घडवलेल्या सुसंकृत राजकारणाला बट्टा लावून महाराष्ट्राची देशात बदनामी या शिंदे गट-फडणवीस सरकारकडून झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारच्या अन्यायी कारभाराला ताकदीने विरोध करेल, असं वक्तव्यही रविकांत वरपे यांनी केलं आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment