जळगाव येथे तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणी झोपलेली असताना तिचे तोंड दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या एका परिसरात 22 वर्षीय तरुणीची आपल्या घरात झोपलेली असताना आरोपी सोन्या उर्फ सुमित सुधाकर बनसोडे याने घरात घुसून तरुणीचे तोंड दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा प्रकार ५ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडला. याबाबत तरुणीने रामानंदनगर पोलीस स्टेशन गाठून पाच रोजी सायंकाळी साडेचार वाजता सुमारास सुमित बनसोडे यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहे

बातमी शेअर करा !
#jalgaonCrimevinaybhang
Comments (0)
Add Comment