खदानीमध्ये बुडून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एरंडोल ;- आई सोबत खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा खेळत असताना पाय घसरल्याने खदानीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना सोमवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील सावदे गावात घडली आहे. त्याचा मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला असता नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला. पाळधी पोलीस दुरक्षेत्रात घडण्याची नोंद करण्याचे काम सुरू होते.

रोहित विकास पठाण (भिल,वय-३, रा. सावदे ता.एरंडोल) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडील विकास सुपडू पठाण हे पत्नी मोनी व ३ वर्षाचा मुलगा रोहित यांच्यासह राहतात. रोहित हा गावातील बालवाडी येथे शिकण्यास जात असतो. नेहमीप्रमाणे सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी पठाण हे शेताच्या कामाला निघून गेले होते. दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोहित हा त्याची आई मोनीबाई तिच्यासोबत खदानीवर कपडे धुण्यासाठी गेला होता तेथे खेळत असताना अचानक त्याचा पाय घसरला व तो पाण्यात पडला.

गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून काही पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य साळुंके यांनी त्याला मयत घोषीत केले. याबाबत पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने नातेवाईकांनी एकाच आक्रोश केला होता.

त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

 

बातमी शेअर करा !
Crimeerandol
Comments (0)
Add Comment