जळगावात २६ बोटे असलेल्या बाळाला मातेने दिला जन्म

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी ग्रामीण रुग्णालयात तब्बल २६ बोटे असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. या नवजात बाळाला दोन्ही हाताला एक- एक तर दोन्ही पायाला तब्बल दोन- दोन बोटे जास्त आहेत. नवजात बाळ व बाळाची आई दोघांचीही प्रकृती सुखरूप आहे. ही वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

मध्य प्रदेशातील झिरन्या येथील रहिवासी असलेल्या ज्योती बारेला या २० वर्षीय महिलेला शनिवारी मध्यरात्री न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने गरोदर मातेची वैद्यकीय तपासणी केली व परिश्रम घेऊन ज्योती बारेला हिची पहाटे यशस्वी प्रसूती केली. जन्माला आलेल्या या बाळाला पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले कारण या बाळाच्या हातापायाला तब्बल २६ बोटे होती. सामान्यतः आपल्या हातापायाची मिळून २० बोटे असतात मात्र या नवजात बाळाला मात्र चक्क २६ बोटे आहेत.

 

बातमी शेअर करा !
#jalgaon२६ बोटांच्या बालकास जन्मMaharashtra NewsMedical ScienceNew Born Babyजळगाव
Comments (0)
Add Comment