काँग्रेस सोडलेली नसताना निलंबनाचा प्रकार म्हणजे एकाधिकारशाही : डॉ.उल्हास पाटील

जळगाव : माझी मुलगी केतकी पाटीलला मोदींचे विचार, त्यांचे कार्य आवडते तिला भाजपाला जायचे आहे मात्र त्यात माझे व देवेंद्र मराठे याचे निलंबन का करण्यात आले ? काँग्रेसमध्ये ही एकाधिकारशाही आहे, ही लोकशाही नाही, अशी भावना माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी सोमवार, 22 रोजी आयोजित पत्रकार परीषदेत व्यक्त केली.

निलंबनानंतर पत्रकार परीषद
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवार, 22 जानेवारी रोजी याबाबत पत्र जारी केले आहे. याबाबत डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, देवेंद्र मराठे यांनी सोमवारी पत्रपरिषद घेऊन भावना व्यक्त केल्या.

पर्यायी मार्ग शोधणार
डॉ.उल्हास पाटील म्हणाले, मला आता दुसरा मार्ग बघायला हवा. तो मार्ग लवकरच कळवू. कन्या केतकीबाबत भाजप ती जाणार असल्याचे सांगितले. माझ्याबाबत मी काहीही सांगितलेले नाही मात्र माझे निलंबन करणे याचा काहीही संबंध नाही. मी काँग्रेस सोडून इतर कुठल्याही पक्षात गेलेलो नाही. तरीही निलंबनाचे आदेश काढणे चुकीचे आहे. देवेंद्र मराठे म्हणाले की, पक्षातून तुम्हाला काढता येणार नाही, असे मला प्रदेश युवा अध्यक्षांनी सांगितले आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कारवाई चुकीची आहे. त्याबाबत वरीष्ठांकडे चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment