जळगाव;- सर्वजण घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील दागिने आणि रोकड ,मोबाईल असा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविण्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी ते ४ ऑक्टोबर दरम्यान शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा मळा येथे घडली . याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की मुंदडा मडा येथे राहणारे केशव गणेश मंजाटे वय 33 हे शेती व्यवसाय करीत असून त्यांचे मुंदडा मळा येथे घर असून तीन रोजीच्या रात्री दहा ते ४ रोजी च्या दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून त्यांच्या घरातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ,मोबाईल पंधराशे रुपये किमतीचा एक मोबाईल, १२ हजार रुपये रोख आणि आठ हजार रुपये रोख असे एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद केशव गणेश मंजाटे यांनी दिल्यावरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय सपकाळे करीत आहे.