जामनेर | प्रतिनिधी
तळेगाव येथील आप्पा कडुबा वंजारी यांच्या शेतातील शेड मधे कोब्रा जातीचा साप शेतमालकाला दिसला व त्यांनी लगेच सर्प मित्र अरुण कोळी याला फोनाद्वारे बोलून घेतले. तत्काल सर्प मित्र आपल्या काही मित्रा सोबत शेतात पोहचले त्यांनी लगेच त्या सर्पाला बगताच हा प्रक्टिकल कोब्रा जातीचा सर्प आहे असे सांगितले.
या कोब्रा सापाला पकडतांना मित्रा समवेत त्याला एक बरनी मधे जेरबंद करुण त्याला वन सवर्क्षण भागात सोडून दिले सर्प मित्र याने आता पर्यत 200च्या वर सर्पां ना जीवदान दिले आहे यामुळे शेतकरी आप्पा वंजारी सह यांच्या मजूर यांनी सुटकेचा श्वास घेतला. सर्प मित्र अरुण कोळी याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे यात मित्र सहकार्य म्हणून अनिल शिंदे, कृष्णा माळी, गोलू कोळी,अरुण कोळी (वाघ ) आकाश कोळी , वैभव घोरपड़े, नागेश कोळी इत्यादी चे सहकार्य लाभले.