गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा

जळगाव – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे बुधवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. इनव्हेस्ट इन गर्ल्स राईट्स: अवर लिडरशिप, अवर वेल बिंग ही यावर्षीची थिम आहे. त्यानुसार कार्यक्रम घेण्यात आले असून येत्या २० ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पोस्टर कॉम्पीटीशनचेही आयोजन करण्यात आले आहे.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे बुधवार, ११ ऑक्टो, २३ रोजी प्रसूती व स्त्रीरोग विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ यांनी यंदाच्यावर्षीची थिम सांगून दिवसाचे महत्व विशद केले. १९ डिसेंबर २०११ रोजी, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ११ ऑक्टोबर हा मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. मुलींना भेडसावणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि मुलींच्या सक्षमीकरणाला आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या पूर्ततेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतो. याप्रसंगी ओबीजीवाय विभागातील सहाय्यक प्रा.मिनाऊ, प्रा.निम्मी वर्गीस, प्रा.जयश्री जाधव यांच्यासह एमएस्सीचे विद्यार्थी उपस्थीत होते.

प्रा. तसेच १० ऑक्टोबर रोजी विविध स्पर्धा घेण्यात आल्या असून सेव्ह गर्ल चाईल्ड या विषयावर निबंध लेखन स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.

बातमी शेअर करा !
#jalgaongodavari
Comments (0)
Add Comment