फैजपुर येथील महिलांना बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक

फैजपूर – गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेल्या डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी दुधापासून बनविले जाणारे मूल्यवर्धन उत्पादने यांविषयी माहिती दिली. तसेच दुधापासून बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कृषीकन्यांनी यावेळी दुधापासून बनवल्या जाणार्‍या पदार्थांची मागणी आणि पदार्थ तयार करण्याच्या प्रक्रिया समजावून सांगितल्या.

कमीत कमी भांडवलात हा गृहउद्योग कसा चालू करू शकतो याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.प्रात्यक्षिक करतांना डॉ. उल्हास पाटील कृषी महाद्यिालयातील कृषीकन्या वैशाली रोडे, सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर, सुप्रिया बडे यांच्यासह गृहिणी सरोज होले, अविधा होले व इतर गृहिणी उपस्थित होत्या. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. देशमुख व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

बातमी शेअर करा !
Basundi making demonstration for women in Faizpur
Comments (0)
Add Comment