भाऊसाहेब राऊत विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जळगाव :  भाऊसाहेब राऊत विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक श्री शशिकांत रायसिंग तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती प्रमोदिनी बाविस्कर, श्री अरुणकुमार बाविस्कर, सौ संगिता शिरसाटे, यांची उपस्थिती होती प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण पर्यवेक्षक श्री एस एम रायसिंग यांनी केले. योगेश आढाळे, दिव्या महाले, अर्चना बोरसे यांनी जिजाऊ यांच्या जीवनावर गीत सादर केले तर रेणुका बाविस्कर, ईच्छा सपकाळे, अक्षरा सारवान, ललित सपकाळे, नेहा सोनवणे, पवन सोनवणे, वैभव कोळी,जागृती सोनवणे, दिव्या महाले, सिद्धार्थ कोळी, दिपाली बाविस्कर या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषणातून माहिती दिली. विद्यालयातील शिक्षिका श्रीमती ए.डी. पगारे यांनी राजमाता जिजाऊ यांचे जीवनावर तर शिक्षक श्री तुषार भोई यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर सविस्तर व सखोल माहिती दिली. भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याचे पुस्तके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शशिकांत रायसिंग यांनी राजमाता जिजाऊ यांचे संस्कार व “आजचा युवक उद्याचा भाग्यविधाता” यावर उदाहरणांसह सविस्तर माहिती आपल्या मनोगतातून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता १० वीची विद्यार्थिनी अश्विनी सपकाळे हिने तर आभार प्रदर्शन इयता १० वीचा विद्यार्थि दक्ष ठाकूर याने केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर यांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment