सर्वसामान्यांना मोठा झटका ; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आताचे दर

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क

नवी दिल्ली: एकीकडे देशातील जनता नववर्षाचं स्वागत करत असताना दुसरीकडे त्यांच्या खिशाला कात्री बसताना दिसत आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी 1 जानेवारी 2023 रोजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. विशेष म्हणजे गॅस सिलिंडरच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत करण्यात आली असून घरगुती गॅस सिलिंडर जुन्या दरात उपलब्ध आहेत.

गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती बदलतात. अशा परिस्थितीत नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा 1 जानेवारी 2023 रोजीही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. 6 जुलै 2022 रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत बदलण्यात आली. त्यावेळी भावात 50 रुपयांनी वाढ झाली होती. गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १५३.५ रुपयांनी महागली आहे. त्याच वेळी, 2022 मध्ये, घरगुती एलपीजीच्या किंमतीत चार वेळा बदल झाला आहे.

बड्या शहरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती
दिल्ली – 1053 रुपये प्रति सिलेंडर
मुंबई – 1052.5 रुपये प्रति सिलेंडर
कोलकाता – 1079 रुपये प्रति सिलेंडर
चेन्नई – 1068.5 रुपये प्रति सिलेंडर

जीएसटी इनव्हॉइसिंग मर्यादा पाच कोटी
1 जानेवारी 2023 पासून GST ई-इनव्हॉइसिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिलाचे नियम बदलणार आहेत. सरकारने ई-इनव्हॉइसिंगसाठी 20 कोटी रुपयांची मर्यादा 5 कोटी रुपयांपर्यंत कमी केली आहे. हा नियम 2023 च्या पहिल्या दिवसापासून लागू होईल. हा नियम लागू झाल्यानंतर आता ज्या व्यावसायिकांचा व्यवसाय वार्षिक पाच कोटींहून अधिक आहे, त्यांना इलेक्ट्रॉनिक बिल तयार करणे आवश्यक होणार आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment