सेंट्रींगच्या पत्र्याच्या प्लेटा अज्ञात चोरटयांनी चोरल्या

जळगाव ;-शहरातील रामानंदनगर परिसरात असणाऱ्या दत्त मंदिराजवळून पंधरा हजार रुपये किमतीच्या 35 सेंट्रींगच्या पत्र्याच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १५ऑगस्ट रोजीच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान घडला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की दत्तू ओंकार राव वय 65 हे मजुरी करत असून त्यांच्या घरा समोरून १५ हजार रुपये किमतीच्या सेंट्रींग कामासाठी लागणाऱ्या पत्र्याच्या ३५ प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार 14 ते 15 ऑगस्ट च्या दरम्यान घडला .याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे करीत आहे.

बातमी शेअर करा !
#jalgaonCrime
Comments (0)
Add Comment