‘लाडकी बहीण’ योजनेत बदल; आठ लाख महिलांना आता फक्त ₹५०० मिळणार

मुंबई: राज्यात महिलांसाठी सर्वाधिक गाजलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेतील अटींनुसार एकाच वेळी दोन सरकारी योजनांचा पूर्ण लाभ घेता येत नाही. त्यामुळे ‘नमो शेतकरी योजनेचा’ लाभ घेणाऱ्या सुमारे आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेत १५०० ऐवजी केवळ ₹५०० मिळणार आहेत.

योजनेत अटींचा प्रभाव:

छाननीदरम्यान असे स्पष्ट झाले की या महिलांना नमो शेतकरी योजनेद्वारे आधीच आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण लाभ देण्याऐवजी फक्त उर्वरित रक्कम ₹५०० प्रति महिना देण्यात येणार आहे.

  • नमो शेतकरी योजना: राज्य सरकारकडून वार्षिक ₹६,०००

  • पंतप्रधान किसान सन्मान निधी: केंद्र सरकारकडून वार्षिक ₹६,०००

  • एकूण: वार्षिक ₹१२,००० आधीच मिळत आहेत

त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण ₹१८,००० वर्षभरात मिळणे अपेक्षित असलेल्या रकमेपैकी उर्वरित ₹६,००० (प्रति महिना ₹५००) इतकीच मदत दिली जाणार आहे.

पार्श्वभूमी: राज्य सरकारने २०२३ मध्ये केंद्राच्या किसान सन्मान निधीच्या धर्तीवर ‘नमो महासन्मान निधी योजना’ सुरू केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment