मुंबई : अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण मिळालं आहे. या सोहळ्याचे निमंत्रण जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांना मिळालं आहे. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण मिळालं आहे. मात्र, अयोध्येतील मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार नसल्याची माहिती हाती आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे.
एकनाथ शिंदेंचं ट्विट-
अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्री रामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी नियमावली जारी
येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्री रामां चा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. याची जय्यत तयारी देशभरात सुरू आहे. त्याचवेळी मोदी सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. माहिती आणि प्रासरणार मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.