जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत जी. नारनवरे यांनी के सी ई सोसायटी संचलित एम जे कॉलेज कॅम्पस मधील रेडिओ मनभावन ला आज सदिच्छा भेट दिली . त्यांनी सामुदायिक रेडिओ बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली . यावेळी संचालक अमोल देशमुख यांनी विविध उपक्रम आणि कार्यक्रम बाबत विस्तृत माहिती दिली असता तसेच जाहिराती देखील कम्युनिटी रेडिओ ला मिळाल्यास तळागाळातील लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविण्यास मदत होवून सर्वसामान्य लोकांना नक्कीच त्याचा फायदा होईल असे सांगत श्री. नारनवरे यांनी सामुदायिक रेडिओ चे कार्याबद्दल कौतुक केले .
यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त वाय एस पाटील, जनसंपर्क अधिकारी शशिकांत पाटील, यासोबत एम जे कॉलेज चे सुभाष तळेले , रेडिओ मनभावन चे संचालक अमोल देशमुख , आर जे स्वामी पाटील , समृद्धी पाटील , ट्रान्समिशन ऑपरेटर राहुल पाटील , दिगंबर सोनार उपस्थित होते.