काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील कन्येसह बुधवारी भाजपात

जळगाव : लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येवून ठेपली असतानाच माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी हा प्रवेश सोहळा होणार असून त्यादृष्टीने कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. डॉ.केतकी पाटील या रावेर लोकसभेसाठी इच्छूक उमेदवार असल्याने या प्रवेश सोहळ्याला अधिक महत्व आले आहे.

यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा
जळगावचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ.केतकी पाटील या भाजपमध्ये बुधवार, 24 रोजी प्रवेश करतील. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होत असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली.

रक्षा खडसेंचे तिकीट कापले जाण्याची चर्चा
एकनाथ खडसेंनी भाजप सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने रक्षा खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यातूनच डॉ.केतकी पाटील आणि उल्हास पाटील यांना भाजपात पक्ष प्रवेश करीत असल्याने राजकीय समीक्षकांच्या नजरा या प्रवेश सोहळ्यासह आगामी राजकारणाकडे लागल्या आहेत.

भाजपाच्या बालेकिल्ल्यात डॉक्टरांना 13 महिने संधी
जळगाव लोकसभा मतदारसंघ 1990 च्या आधी काँग्रेसचा गड होता. मात्र डॉ. गुणवंतराव सरोदे यांनी दोन ‘टर्म’ या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे सरकार कोसळल्यानंतर मध्यावधी निवडणुका झाल्या. तेव्हा डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसचे खासदार झाले होते मात्र हे सरकार 13महिन्यांत कोसळले व 1999 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. तेव्हा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. तेव्हापासून आत्तापर्यंत हा मतदारसंघात भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे, हे विशेष !

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment