नाराज टीचरला पाहून तिची समजूत काढू लागला चिमुकला, शिक्षिका-विद्यार्थ्याचा क्यूट व्हिडिओ व्हायरल!

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ व्हायरल  होत असतात. यामध्ये काही व्हिडिओ हे मजेदार असतात तर काही व्हिडिओ हे आपल्याला चकीत करणारे असतात. काही व्हिडिओ असे असतात जे खूप क्यूट असतात. लहान मुलांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका टीचर आणि विद्यार्थ्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थी आणि टीचरचे क्यूट संभाषण व्हायरल होत आहे. यामध्ये मुलगा आपल्या शिक्षिकेची समजूत काढताना दिसत आहे.

 

सर्वांनाच आवडला क्यूट व्हिडिओ
शाळकरी मुलांचे क्यूट व्हिडिओ सोशल मीडियावर दररोज लोकांचे लक्ष वेधून घेतात. यादरम्यान प्रत्येकजण त्यांच्या क्यूट स्टाइलच्या प्रेमात पडतो. आता पुन्हा एक व्हिडिओ समोर आला आहे जो एका शाळकरी मुलाचा आणि त्याच्या शिक्षिकेचा आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की, शिक्षका वर्गात येताच त्या मुलावर रागावतात आणि नाराज होऊन बसतात. आपल्या शिक्षिकेला दुःखी असल्याचे पाहून तो मुलगा तिथे पोहोचतो आणि शिक्षिकेची समजूत घालण्यासाठी तिथे येतो. खूप प्रयत्नानंतर हा मुलगा शिक्षिकेची नाराजी देखील दूर करतो.

 

मुलावर नाराज झाली होती टीचर
या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिक्षिका वर्गात येते. यानंतर ती विद्यार्थ्यावर नाराज होऊन बसते. यानंतर लगेच मुलगा नाराज झालेल्या शिक्षिकेची समजूत काढण्यासाठी येतो. शिक्षिका म्हणते की, मी कितीही नाही म्हणाले तरी तु वर्गात बोलतो. यावेळी मुलगा चुक झाली असे म्हणतो. मात्र शिक्षिका नाराजच राहते. यावेळी तो पुन्हा पुन्हा शिक्षिकेला सांगतो की, आता मी बोलणार नाही. तरीही शिक्षका त्याच्याशी बोलत नाही आणि नाराज होऊन बसते. तेव्हा तो खूप वेळा प्रेमाने बोलून आपल्या टीचरची समजून काढतो. हा क्यूट आणि लक्ष वेधून घेणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा आहे तो क्यूट व्हिडिओ

 

 

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment