जामनेर येथील ज्ञानगंगा विद्यालयात दहीहंडी उत्साहात संपन्न

जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात मोठ्या उत्साहात दहीहंडी चा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य,श्री राजेंद्र सोनवणे यांचे शुभहस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. दहीहंडी मध्ये ढोल ताश्याच्या गजरात इ.५वी ते इ.१२वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला असून इ.९ वी च्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून जल्लोष केला. शालेय विद्यार्थी यांचे सोबत प्राचार्य,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील दहीहंडी च्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. विजयी गोविंदा हर्षल गोपाल सावंत यांचे प्राचार्य, श्री राजेंद्र सोनवणे यांनी शाळकरी मुंलाचे अभिनंदन केले. या दहीहंडी ठिकाणी उपस्थित विनय खोंडे,विलास पाटील, विजय कोळी,योगेश बावस्कर अनिल देशमुख,रुपेश क्षीरसागर,राहुल महाजन, नंदकिशोर पाटील,सौ.मनीषा भारंबे,सौ.स्नेहल पाटील, रोहिणी पाटील,शीतल पाटील, रुपाली पाटील, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment