जळगाव | प्रतिनिधी
गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरे याच्या संयुक्त विद्यमाने कै.रामदास त्र्यंबक दिघे-पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेच्या परिसरात विविध प्रजातीचे ८५ रोपाची लागवड करण्यात आली. याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे राजेंद्र राणे, शाळेचे माजी विद्यार्थी अनिल पाटील, दापोरेचे सरपंच महादवराव गवंदे , गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळ, शाळेचे शिक्षकांसह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे क्षेत्रीय अधिकारी विक्रम अस्वार, वन विभाग व सामाजिक वनीकरणाचे क्षेत्रीय अधिकारी देविदास जाधव, अनिल साळुंखे, संदीप पाटील, भरत पवार आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांमध्ये राजेंद्र राणे यांनी वृक्ष संवर्धना बाबत सजगता निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन केले. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमाविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिली. अनिल पाटील यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रत्यर्थ वृक्षारोपणाचा उपक्रम घेतला असून शाळेच्या परिसरात जे वृक्ष लागवड केली आहे त्याची जबाबदारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांसह सर्वांनी घेतली पाहिजे असे सांगितले. दापोरे गावात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून जनहिताचे विविध उपक्रम राबविले जात आहे. सूत्रसंचालन समाधान पाटील यांनी केले. राहुल मोरे यांनी आभार मानले.