१२०० विद्यार्थ्यांना आज मोफत सायकलींचे वाटप

चाळीसगाव : आपल्या विविध समाजोपयोगी उप्रक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दुध संघाचे चेअरमन, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आलेली आहे. त्याअंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील १२०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण समारंभ येथे आज दि.१२ सप्टेंंबर रोजी दुपारी ४ वा.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीशभाऊ महाजन यांंच्याहस्ते या विद्यार्थ्यांना सायकल भेट दिली जाणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन हे भूषवणार आहेत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकितजिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांची उपस्थिती असेल. तरी सर्वांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आशीर्वाद द्यावा,असे आवाहन आयोजक आ.मंगेश चव्हाण यांना केली आहे.

बातमी शेअर करा !
Comments (0)
Add Comment