रात्री तुमच्या बाईकच्या मागे कुत्रे भुंकतात? स्वत: ला कसं वाचवाल? जाणून घ्या!

दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क 

आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाने हे पाहिलं असेल की, सहसा रात्रीच्यावेळी बाईकवाल्यांच्या पाठी कुत्रे लागतात. परिणामी छोट्या-मोठ्या अपघाताला लोक बळी पडतात. तुम्ही देखील रात्रीची गाडी चालवताना असा अनुभव नक्कीच घेतला असणार. रात्रीच्या वेळी जेव्हा ते कुत्रे असतात, अशा रस्त्यावरून जातात तेव्हा ते कुत्रे दुचाकीवर भुंकतात आणि त्याचा पाठलाग करतात. खरंतर कुत्रे मागे लागले की, लोक जोरदार गाडी पळवतात, परंतु याशिवाय या परिस्थीला कसं हाताळायचं हे अनेकांना माहिती नसते. तर आज आम्ही अशाच काही युक्ती सांगणार आहोत, ज्याचा वापर जर तुम्ही केलात, तर तुमच्यापाठी कधीही कुत्रे लागणार नाहीत.

 

रात्रीच्या वेळी बाईकवर का भुंकतात कुत्रे ? 

मात्र असे होऊ नये असे आपल्याला नक्कीच वाटत असेल. एवढेच नाही, तर कुत्रे गाडीवर का भूंकतात? ते गाडीमागे का लागतात? हा टाळण्याचा उपाय काय, असे प्रश्न अनेकांच्या मनात आलेले असू शकतात. खरे, तर कुत्रे भुंकण्याची अनेक कारणं असू शकतात. खरे तर, आपण जेव्हा रात्रीच्या वेळी बाईक अथवा स्कूटरवरून कुत्र्यांच्या बाजूने जातो, तेव्हा आपल्या वेगामुळे ते भडकतात आणि भुंकत पाठलाग करतात. मात्र, असे होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

कुत्र्यांना बाईकचा पाठलाग करण्यापासून आणि भुंकण्यापासून कसं थांबवायचं?

रात्रीच्या वेळी आपल्या बाईकवर कुत्र्यांनी भुंकूनये आणि बाईक मागे लागू नये, असे आपल्याला वाटत असेल तर, त्यांच्याजवळून जाताना बाईकचा वेग कमी करा. आपल्या लक्षात येईल, की असे केल्याने कुत्रे आपल्यावर भुंकत नाहीत. तथापी, तुमची बाईक कमी वेगात असतानाही कुत्रे तुमच्यावर चालून आले तरी घाबरून गाडी वेगात चालवू नका कारण यामुळे अपघातही होऊ शकतो.  अशा स्थितीत, बाईक थांबवा. कुत्र्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करा.  यानंतर हळू हळू बाईक पुढे न्या आणि तेथून निघून जा. सर्वसाधारणपणे असे केल्याने कुत्रे मागे फिरतात.

 

बातमी शेअर करा !
Bike ridedogKnowledge
Comments (0)
Add Comment